व्हिडिओ : अमिताभ-फरहानचा 'वजीर'!

'वजीर' या सिनेमातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याच सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. 

Updated: Dec 19, 2014, 03:05 PM IST
व्हिडिओ : अमिताभ-फरहानचा 'वजीर'! title=

मुंबई : 'वजीर' या सिनेमातून अभिनेते अमिताभ बच्चन आणि फरहान अख्तर हे पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत. याच सिनेमाचा टीजर प्रदर्शित करण्यात आलाय. 

विधु विनोद चोपडा, राज कुमार हिरानी आणि बिजॉय नाम्बियार यांच्या या सिनेमात फरहान आणि अमिताभ दोघंही अत्यंत गंभीर अशा भूमिकेत दिसत आहेत. 

या सिनेमात फरहान एटीएस ऑफिसरच्या भूमिकेत दिसतोय तर अमिताभ बुद्धिपटाचे एक चलाख खेळाडू म्हणून दिसतायत. फरहाननं नुकताच आपल्या या सिनेमाचा १ मिनिट १९ सेकंदांचा एक टीझर सोशल वेबसाईटवर शेअर केलाय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.