मुंबई : सगळ्या प्रेक्षकांचा लाडक्या 'दिलवाले दुल्हनियाँ ले जाऐंगे' या सिनेमानं यंदा तब्बल 20 वर्ष पूर्ण केलेत.
याच सिनेमाच्या मेकिंगची डॉक्युमेन्टरी नुकतीच यशराज फिल्मसनं प्रदर्शित केलीय. यामध्ये 20 वर्षांपूर्वीचा शाहरुख खान, काजोल, आदित्य चोपडा, करण जोहर दिसत आहेत... इतकंच नाही तर यशराज चोपडाही या डॉक्युमेन्टरीमध्ये दिसत आहेत.
या सिनेमाद्वारेच आदित्य चोपडानं दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं होतं. बॉलिवूडचा हा रोमान्टिक ड्रामा आजही तितकाच प्रेमळ वाटतो... आणि म्हणूनच 20 वर्षानंतरही मुंबईच्या मराठी मंदिर सिनेमागृहात हा सिनेमा आजही झळकतोय.
व्हिडिओ पाहा :-
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.