VIDEO : पॅरीस हल्ला; दु:खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना!

पॅरीस हल्ल्यात दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्यात शिकार ठरलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देताना एका कॉन्सर्टमध्ये पॉप गायिका मॅडोना दु:खान स्टेजवरच कोसळली.

Updated: Nov 16, 2015, 06:21 PM IST
VIDEO : पॅरीस हल्ला; दु:खानं स्टेजवरच कोसळली मॅडोना! title=

लॉस एन्जेलिस : पॅरीस हल्ल्यात दहशतवाद्यांच्या क्रूर हल्ल्यात शिकार ठरलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देताना एका कॉन्सर्टमध्ये पॉप गायिका मॅडोना दु:खान स्टेजवरच कोसळली.

स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये कॉन्सर्ट दरम्यान मृतांना श्रद्धांजली देताना मॅडोनाचे डोळे पाणावले. 'कार्यक्रम करताना मला अनेक अडचणी आल्या... काल जे घडलं त्याला प्रयत्न करूनही विसरता येत नाहीय. पॅरीसमध्ये काल रात्री दु:खद हत्येची क्रूर घटना डोक्यात भिनभिनतेय... जेव्हा लोक आपल्या जवळच्या नातेवाईकांना गमावून रडत आहेत... अशा वेळी मला इथं येऊन डान्स करणं कसं शक्य आहे?' असं यावेळी मॅडोनानं म्हटलं.

परंतु, धीर धरत तिनं आपलं म्हणणंही लोकांसमोर मांडलं. दहशतवाद्यांना हेच हवंय. त्यांना आपला आवाज बंद करायचाय. पण, आपण त्यांना असं करू देता काम नये, असं म्हणत तीनं आपली कॉन्सर्टही पूर्ण केली. 

व्हिडिओ पाहा :- 
 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.