मुंबई : 'बेहद' या कार्यक्रमात एका लग्नाचा सीनचं शुटिंग सुरू असताना मंडपानं अचानक जोरात पेट घेतला... पण, या कार्यक्रमातील 'हिरो' कुशाल टंडन याच्या सावधानतेमुळे धोका वेळीच टळला.
अभिनेता कुशाल टंडन आणि अभिनेत्री जेनिफर विंगेट हे 'बेहद' या कार्यक्रमातील लग्नाचा सीन शूट करत होते. मंडपात जेनिफर नटून-थटून बसली होती... आणि अचानक मंडपानं एकाएकी जोरात पेट घेतला.
आग हा सीनचाच एक भाग असल्याचं समजून शूटिंगच्या नादात जेनिफर तिथंच बसून राहिली... परंतु, आग आटोक्याच्या बाहेर गेल्याचं कुशालच्या लक्षात आलं आणि त्यानं मंडपात येऊन जेनिफरला सुखरुपरित्या बाहेर घेऊन गेला.
या दरम्यान कुशालच्या मानेवर आणि पायावर भाजल्यानं जखम झालीय. हा अनुभव खुद्द कुशालनंच सोशल मीडियावर शेअर केलाय.