सलमान - शाहरुखमधला समान दु:खाचा धागा!

Updated: Mar 20, 2015, 09:49 PM IST


सलमान 'वीर'सोबत

मुंबई : बॉलिवूड स्टार शाहरूख खान आणि सलमान खान यांच्याबरोबर एक समान दु:खद घटना घडलीय. शाहरुखचा कुत्रा 'डैश'नंतर आता सलमानचा कुत्रा 'वीर' याचा मृत्यू झालाय. 

सलमाननं त्याच्या लाडक्या 'वीर' या कुत्र्यासोबतची आपली आठवण ट्विटरवर शेअर केलीय. वीरसोबतचे दोन फोटो सलमाननं सोशल वेबसाईट ट्विटरवर शेअर केलेत. या फोटोंमध्ये सलमान त्याच्या कुत्र्याच्या मृतदेहासमोर बसून दु:ख व्यक्त करताना दिसतोय. 

दोन महिन्यांपूर्वी वीरचा मृत्यू झाल्याची माहिती सलमाननं ट्वीटरवरून आपल्या चाहत्यांना दिलीय. सलमाननं त्याच्या 'वीर' या सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी या कुत्र्याला खरेदी केलं होतं. म्हणून त्याचं नामकरण 'वीर' असं करण्यात आलं होतं, अशी आठवणही यावेळी सलमाननं आपल्या चाहत्यांशी शेअर केलीय.

काही दिवसांपूर्वी शाहरूखचा कुत्रा 'डॅश'चाही मृत्यू झाला होता. ही माहितीही शाहरूखनने ट्विटरवरून सर्वांना दिली होती. त्यामुळे, शाहरुख आणि सलमान समदु:खी असल्याचं दिसतंय. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.