नवी दिल्ली : बॉलिवूडमध्ये 'शुद्ध देसी रोमान्स' या सिनेमाच्या माध्यमातून एंट्री केलेली अभिनेत्री वाणी कपूर हिने आपला 26 वा वाढदिवस साजरा केला. मात्र, ती अभिनेत्री होण्याआधी चक्क हॉटेलमध्ये काम करायची, ही बाब पुढे आली. हॉटेलमधील कामानंतर वाणी ही मॉडेलिंग क्षेत्राकडे वळली. तिथे तिची ओळख निर्मात्याशी झाली आणि तिला चक्क सिनेमाची ऑफर मिळाली.
दिल्लीमध्ये राहणारी वाणी कपूर मॉडेलिंग करता करता हिंदी चित्रपटसृष्टीत दाखल झाली. तिला सिनेमात येण्यासाठी फारसा संघर्ष करावा लागला नाही. आतापर्यंत तिला एक हिंदी सिनेमात काम मिळाले आहे. मात्र, तिला दक्षिणेकडील टॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे. 'आहा कल्याणम' (Aaha Kalyanam) या सिनेमात काम केलेय.
वाणी हिचा जन्म 23 ऑगस्ट 1988 ला झाला. तिचे वडील फर्निचर एक्सपोर्टचे काम करतात. तर आई मार्केटींग एक्झिक्युटीव्ह आहे. त्याआधी त्या शिक्षकाचे काम करायच्या. तर मोठी बहीणचे लग्न झाले. ती नेदरलँडला राहत आहे. वाणीने आपले शिक्षण माता जय कौर पब्लिक स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने इंदिरा गांधी नॅशनल ओपन विद्यापीठातून टुरिझमची डिग्री घेतली. त्यानंतर करिअर करण्यासाठी तिने जयपूरमधील ओबेरॉय हॉटेलमध्ये इंटरर्नशिप केली.
वाणीने आयटीसी हॉटेलमध्ये काम केलेय. ती छोट्या पडद्यावर मालिकांमधूनही काम केले. तिने मीडियाला सांगितले की, 'शुद्ध देशी रोमान्स'च्या कास्टिंग निर्देशक शानू शर्मा यांच्याशी ओळख झाली. त्यांनी तिला सिनेमाची ऑफर दिली. त्यानंतर तिला निर्देशक मनीष शर्मा यांच्याशी भेट घालून दिली. 'शुद्ध देशी रोमान्स' या सिनेमाला पुरस्कारही मिळाला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.