'द कपिल शर्मा' शोमध्ये पुन्हा येणार ही कलाकार

'द कपिल शर्मा' शोला कपिल आणि सुनिल ग्रोव्हरच्या वादामुळे उतरती कळा लागली होती. परंतू आता हा शो पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे. शोमध्ये अनेक नवीन कलाकार येणार आहेत. परंतू सुनिल ग्रोव्हरची जागा भरणे शक्य नव्हते. त्यामुळे आता काही जुनीच कलाकार मंडळी या शोमध्ये पुनरागम करणार आहेत.

Intern Intern | Updated: Apr 15, 2017, 01:34 PM IST
'द कपिल शर्मा' शोमध्ये पुन्हा येणार ही कलाकार  title=

मुंबई : 'द कपिल शर्मा' शोला कपिल आणि सुनिल ग्रोव्हरच्या वादामुळे उतरती कळा लागली होती. परंतू आता हा शो पुन्हा एकदा नव्याने सुरू होणार आहे. शोमध्ये अनेक नवीन कलाकार येणार आहेत. परंतू सुनिल ग्रोव्हरची जागा भरणे शक्य नव्हते. त्यामुळे आता काही जुनीच कलाकार मंडळी या शोमध्ये पुनरागम करणार आहेत.
 
प्रेक्षकांची लाडकी बूवा उपासना सिंग पुन्हा एकदा या शोमध्ये दिसणार आहे. बूवाच्या भूमिकेतील उपासना अतिशय लोकप्रिय होती. परंतू आता ती या शोमध्ये वेगळी भूमिका साकारणार आहे.
 
गेल्या अनेक दिवसांपासून या शोसाठी काम करण्याबाबत मला विचारण्यात येत आहे. तसेच प्रेक्षकांची उत्सुकता पाहून मी पुन्हा कपिलसोबत काम करण्यास तयार आहे, असे उपासनाने सांगितले. त्यामुळे कपिलला आता दिलासा मिळाला आहे. प्रेक्षकांना आता या शोचे नवे रूप पाहायला मिळणार आहे.