अभिनेत्री रतन राजपूतची सेटवर काढली छेड

टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत हिच्या सोबत सेटवर छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आलाय. संतोषी माँ या सिरीअलचं शुटींग करत असतांना सेटवरील लाईट मॅनने तिच्यासोबत गैरव्यवहार केल्याचं तिचं म्हणणं आहे. 

Updated: Jan 5, 2016, 06:17 PM IST
अभिनेत्री रतन राजपूतची सेटवर काढली छेड     title=

मुंबई : टीव्ही अभिनेत्री रतन राजपूत हिच्या सोबत सेटवर छेडछाड झाल्याचा प्रकार समोर आलाय. संतोषी माँ या सिरीअलचं शुटींग करत असतांना सेटवरील लाईट मॅनने तिच्यासोबत गैरव्यवहार केल्याचं तिचं म्हणणं आहे. 

सेटवरील लाईट मॅनने जबरदस्ती तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. रतनने त्याला विरोध केला आणि त्याची तक्रार करण्यासाठी ती प्रोडक्शन टीमकडे पोहोचली. पण त्यांनी त्या लाईट मॅनविरोधात कोणतीही अॅक्शन न घेतल्याने रतनला राग आला आणि तिने शुटींग करणार नाही असं सांगितलं. पण त्यानंतर प्रोडक्शन टीमने लाईट मॅनला काढून टाकलं.

संतोषी माँ या सिरीअलची प्रोड्यूसर रश्मी शर्मा यांनी अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं म्हटलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार या घटनेबाबत सिरीअलच्या टीमला कोणतीही चर्चा न करण्याचं सांगितलं गेलं आहे.