दहशदवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारा - अक्षय कुमार

पंजाबमधील पठानकोट येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार यांनं मोठं वक्तव्य केलंय. अक्षय कुमारने म्हटलं की 'जे पण झालं ते चुकीचे आहे. मी फक्त एवढंच म्हणेण की दुश्मनांना याचं उत्तर दिलं पाहिजे. दहशदवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं पाहिजे.'

Updated: Jan 5, 2016, 04:55 PM IST
दहशदवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारा - अक्षय कुमार title=

मुंबई : पंजाबमधील पठानकोट येथे झालेल्या दहशदवादी हल्ल्यावर अभिनेता अक्षय कुमार यांनं मोठं वक्तव्य केलंय. अक्षय कुमारने म्हटलं की 'जे पण झालं ते चुकीचे आहे. मी फक्त एवढंच म्हणेण की दुश्मनांना याचं उत्तर दिलं पाहिजे. दहशदवाद्यांना त्यांच्या घरात जाऊन मारलं पाहिजे.'

अक्षय कुमारने म्हटलं की 'मी रिअल नाही तर रिल लाईफ हिरो आहे पण आपले देशाचे धाडसी जवान हे खरे हिरो आहेत.'

अक्षय कुमार हा खेळाडूंच्या उत्साह वाढवण्यासाठी एका कार्यक्रमात गेला होता. त्यावेळेस पत्रकारांशी बोलतांना त्याने हे वक्तव्य केलं.