'बाहुबली २' हिंदी व्हर्जनची तीन दिवसांत १२८ कोटींची कमाई

भव्यदिव्य बाहुबली २ द कनक्लूजन या सिनेमाने हिंदी व्हर्जनमध्ये तीन दिवसांत बक्कळ कमाई केलीये.

Updated: May 1, 2017, 03:25 PM IST
'बाहुबली २' हिंदी व्हर्जनची तीन दिवसांत १२८ कोटींची कमाई title=

मुंबई : भव्यदिव्य बाहुबली २ द कनक्लूजन या सिनेमाने हिंदी व्हर्जनमध्ये तीन दिवसांत बक्कळ कमाई केलीये.

वीकेंडमध्ये कमाईच्या बाबतीत बाहुबली २ ने सुल्तान, दंगललाही खूप मागे टाकलेय. तीन दिवसांत बाहुबली २ने तब्बल १२८ कोटींची कमाई केलीये. 

शुक्रवारी या सिनेमाने ४१ कोटी कमावले. शनिवारी या सिनेमाने ४०.५० कोटींची कमाई केली. तर रविवारी ४६.५० कोटी कमावले. एकत्रितरित्या तीन दिवसांत या सिनेमाने १२८ कोटींची हिंदीत कमाई केलीये. इतक्य़ा मोठ्या कमाईचा आकडा गाठत या सिनेमाने नवा इतिहासच रचलाय.