सलमान ईदलाच का करतो सिनेमा रिलीज?

अभिनेता सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून ईदच्या दिवशी फिल्म रिलीज करण्याची सवयच झालीय. सल्लू मियाचे चाहते ईदच्यादिवशी त्याच्या चित्रपटाची वाट बघत असतात.  

Updated: Jun 29, 2014, 05:00 PM IST
सलमान ईदलाच का करतो सिनेमा रिलीज? title=

नवी दिल्ली : अभिनेता सलमान खानला गेल्या काही वर्षांपासून ईदच्या दिवशी फिल्म रिलीज करण्याची सवयच झालीय. सल्लू मियाचे चाहते ईदच्यादिवशी त्याच्या चित्रपटाची वाट बघत असतात.  

मात्र तुम्ही कधी विचार केलाय का? पांडेजी म्हणजेच सल्लू नेहमी ईदच्या दिवशीच फिल्म का रिलीज करतो.

आम्ही तुम्हाला अशा काही गोष्टी सांगतो, त्यामुळे तुमच्याही लक्षात येईल सलमान ईदच्या दिवशी फिल्म रिलीज का करतो...

सलमानचा 'वॉन्टेड' सिनेमा पहिल्यांदा ईदच्या दिवशी रिलीज झाला होता. त्यात सलमानने फाइट सीन्स केले होते आणि तो सिनेमा सलमानसाठी कमबॅक फिल्म होती. 

ही फिल्म ईदच्या मुहर्तावर रिलीज झाली होती आणि त्यानंतर ईदच्या दिवशी फिल्म रिलीज करणं हे सलमानचे कॉपीराईट झालं. वॉन्टेड कोटीच्या घरात गेले होते. सलमानला या चित्रपटाला एक नवे चाहतेही मिळाले होते. 

त्याच्यानंतर 2010 ला रिलीज झालेली 'दबंग' मधल्या चुलबुल पांडेच्या भूमिकेमुळे सलमानला एक नवी ओळख मिळाली तसेच ईदच्या दिवशी रिलीज झाल्याने प्रायोगिक तत्वाचा प्रभावीपणे सिद्ध झाला. 

फिल्म ही खूप हिट झाली. या फिल्मने बॉलिवूडचे रेकॉर्डही तोडले. सुमारे 145 कोटीचा बंपर ही कमावला. 

2011 ला करिना कपूरसोबत सलमान खानचा चित्रपट 'बॉडीगार्ड' चित्रपट रिलीज झाला. सल्लु भाईने चित्रपटाच्या रिलीजसाठी पहिलीच ईदची तारीख जाहीर केली होती. त्याचवेळी ईदच्या मुबारकच्या वेळी सलमानने इंडियन चित्रपटाला एकदा सुपरहिट सिनेमा केला. 

बॉक्सऑफिसवर 20 कोटीचे शानदार ओपनिंग या चित्रपटाने केली. एकदा पुन्हा ईद सलमान लकी ठरली आणि सिनेमाही हिट झाला. 

ईदची वाट बघत असलेल्या सलमान पुन्हा 'एक था टाइगर' चित्रपट रिलीज केला.  त्या चित्रपटात अभिनेत्री कतरिना कैफने काम केलं होते. 

फिल्मच्या समीक्षकांना या चित्रपटांपासून काही अपेक्षा नव्हत्या मात्र सलमानला यावर पूर्ण भरोसा होता. त्याचवेळी 32 कोटीच्या आकडा पार करत ब्लॉकबस्टर फिल्म सिध्द करुन फिल्मने 198 कोटीची शानदार कमाई केली. 

यावर्षी सलमानचा चित्रपट 'किक' सोबत संपूर्ण बॉक्सऑफिस हलवण्यासाठी तयार आहे. 'किक' आता रिलीज होण्यासाठी तयार झाला आहे. आता वेळ आहे ईदची यावेळी बघता येईल ईद सल्लूला किती लकी ठरते.
 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.