मुंबई : सध्या आलेल्या 'क्या कूल है हम 3' या चित्रपटाच्या पोस्टरने अश्लीलतेच्या सर्व मर्यादा पार केल्या आहेत. सोशल मीडियावर तसेच अन्य माध्यमांवर हा बॉलिवूड नाही पोर्न चित्रपटांचे पोस्टर आहे, असेच सांगण्यात आले आहे.
बॉलीवूडमध्ये याआधी ही असेच विवादास्पद आणि अश्लील पोस्टर आले आहेत. ज्यांच्यावर टीका झाली. चित्रपटांच्या अश्लील पोस्टरवरून अनेक वाद निर्माण झाले. तर काही धार्मिक आणि सामाजिक कारणामुळे झालेत.
राम तेरी गंगा मैली
१९८५ मधील राज कपूर यांचा चित्रपट 'राम तेरी गंगा मैली' या चित्रपटांच्या पोस्टरमध्ये अभिनेत्री मंदाकिनीला उत्तेजक, अर्धनग्न अवस्थेत दाखवण्यात आले होते. त्यावेळी अशा प्रकारच्या पोस्टरचा ट्रेन्ड होता. परंतु अशा प्रकारचे दृश्य असणारा हा पहिलाच पोस्टर होता. नंतर काही कारणाने हे पोस्टर बदली करण्यात आले.
जुली
नेहा धूपियाचा 'जूली' चित्रपटांनी ही खूप वाद निर्माण झालेला. जुलीच्या पोस्टरमध्ये ही न्यूड फोटोचा वापरण्यात करण्यात आलेला. पोस्टरवर टीका केल्यामुळे नेहा धूपियाला राग आला होता. तेव्हा तिने सांगितले होते की या चित्रपटांचा पोस्टर हे कथानकांला अनूसरूनच तयार करण्यात आले आहे. परंतु काही लोकांनी नेहावर अश्लीलता पसरवण्याचा आरोप केला.
'जिस्म-२'
पोर्नच्या विश्वातून बॉलीवूडमध्ये आलेली अभिनेत्री म्हणजे सनी लियॉनी. सनीच्या 'जिस्म-२'च्या पोस्टरवर ही बरीच टीका झाली. एखाद्या पोर्न चित्रपटासाठी ज्याप्रकारे पोस्टर काढले जाते अगदी तश्याच फोटो वापर करून हे पोस्टर तयार करण्यात आलेले. अनेक सामाजिक संस्थानी या विषयी आंदोलने केली.
डर्टी पिक्चर
दक्षिण भारतातील अभिनेत्री सिल्क स्मिताच्या जीवनावर आधारीत एकता कपूरचा २०११मध्ये आलेला 'डर्टी पिक्चर'च्या पोस्टरमध्ये विद्या बालनला कामुक हावभाव देताना दाखवण्यात आले. त्यानंतर दक्षिण भारतातील अनेक संस्थानी याविषयी आक्षेप घेतला. तरीही चित्रपटांचे पोस्टर आहे तसेच ठेवण्यात आले.
कुर्बान
'कुर्बान' आणि 'पाप' या चित्रपटांच्या पोस्टरवर देखील अश्याच प्रकारे अश्लील असण्याचा आरोप करण्यात आलेला.
पीके
तर 'पीके' या आमीर खानच्या चित्रपटांतील रेडियो घेऊन उभा असलेल्या चित्रपटांच्या पोस्टरवरून देखील खूप मोठा वाद निर्माण झालेला.