तेजश्री आणि उमेश कामत पहिल्यांदा येणार एकत्र

होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता उमेश कामत दोघेही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.

Updated: Jan 29, 2017, 04:00 PM IST
तेजश्री आणि उमेश कामत पहिल्यांदा येणार एकत्र title=

मुंबई : होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री तेजश्री प्रधान आणि अभिनेता उमेश कामत दोघेही पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करणार आहेत.

दिग्दर्शक सुश्रुत भागवत यांच्या आगामी सिनेमात उमेश आणि तेजश्री एकत्र काम करणार आहेत.

अभिनेत्री शर्वरी पिल्लईदेखील या सिनेमात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे..त्यामुळे आता नेमका हा प्रोजेक्ट कसा असेल याची उत्सुकता तेजश्री आणि उमेशच्या चाहत्यांना लागलीये.