'टांगे रगडो, सेक्स करो' शब्दांमुळे चित्रांगदानं सोडला सिनेमा

एखाद्या सिनेमाच्या सेटवर काय पाहायला मिळेल, सांगता येत नाही... असंच काहीसं घडलं ते 'बाबूमोशाय बंदूकबाझ' या चित्रपटाच्या सेटवर... आणि त्यामुळेच अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिनं या चित्रपटाला राम राम केलाय. 

Updated: Jun 14, 2016, 04:34 PM IST
'टांगे रगडो, सेक्स करो' शब्दांमुळे चित्रांगदानं सोडला सिनेमा title=

मुंबई : एखाद्या सिनेमाच्या सेटवर काय पाहायला मिळेल, सांगता येत नाही... असंच काहीसं घडलं ते 'बाबूमोशाय बंदूकबाझ' या चित्रपटाच्या सेटवर... आणि त्यामुळेच अभिनेत्री चित्रांगदा सिंग हिनं या चित्रपटाला राम राम केलाय. 

एक अंतर्दृश्य चित्रीत करत असताना चित्रांगदाला सेटवरचं वातावरण विचित्र आणि आक्षेपार्ह वाटलं... त्यामुळे तिनं तिथंच सेटवर हा सिनेमा सोडल्याचं जाहीर केलं. 

सेक्सदृश्य चित्रीत होत असताना दिग्दर्शक चित्रांगदाला तेच दृश्यं पुन्हा पुन्हा करण्यास सांगत होता, यामुळे तिचे दिग्दर्शक कुशनबरोबर भांडण झाले... आणि त्यानंतर चित्रांगदानं हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला. 

उपस्थितांच्या माहितीनुसार, नवाझ जोराने चित्रांगदाला बेडवर खेचतो आणि आपल्याला कोणीतरी पाहतेय असे दोघांच्या लक्षात येते, असा तो सीन होता. पण, कुशन हे दृश्य चित्रीत होत असताना 'चित्रांगदा तुला नवाझच्या वर असायला हवंयय... टांगे रगडो, सेक्स करो' असं तो ३९ वर्षीय अभिनेत्रीला संपूर्ण युनिटसमोर ओरडून ओरडून बजावून सांगत होता. हेच चित्रांगदाला खटकलं... आणि तिनं या चित्रपटाला रामराम ठोकला.