फिल्म रिव्ह्यू: मेघना गुलजार यांचा एक शानदार चित्रपट 'तलवार'

ग्रेटर नोएडातील प्रसिद्ध अशा आरुषी हत्याकांड प्रकरणावर आधारित चित्रपट 'तलवार' या शुक्रवारी रिलीज झालाय. मेघना गुलजार यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट दमदार आहे.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Oct 4, 2015, 05:07 PM IST
फिल्म रिव्ह्यू: मेघना गुलजार यांचा एक शानदार चित्रपट 'तलवार' title=

मुंबई: ग्रेटर नोएडातील प्रसिद्ध अशा आरुषी हत्याकांड प्रकरणावर आधारित चित्रपट 'तलवार' या शुक्रवारी रिलीज झालाय. मेघना गुलजार यांचं दिग्दर्शन असलेला हा चित्रपट दमदार आहे.

चित्रपटाचं नाव - तलवार
दिग्दर्शक - मेघना गुलजार
कलाकार - नीरज कबी, इरफान खान, कोंकणा सेन, तब्बू, सोहम शाह, गजराज राव, अतुल कुमार
वेळ - १३२ मिनीट
सर्टिफिकेट - U/A
रेटिंग - ३ स्टार्स

मेघना गुलजार प्रसिद्ध गीतकार गुलजार आणि अभिनेत्री राखी यांची मुलगी... मेघनानं 'फिलहाल सारखा चित्रपट केलाय. 'जस्ट मॅरिड', २००७मध्ये 'दस कहानियाँनंतर तब्बल ८ वर्षांनी आरुषी हत्याकांडावर आधारित तलवार हा चित्रपट केलाय. 

कथानक
चित्रपटाची कथा २००८मध्ये ग्रेटर नोएडा इथं झालेल्या आरुषी हत्याकांडाच्या तपासावर आहे. ही कथा आहे टंडन दाम्पत्याची... चित्रपटात नावं बदलण्यात आलीय. रमेश टंडन (नीरज कबी), नूतन टंडन (कोंकणा सेन) आपली मुलगी श्रुती टंडन सोबत राहतात. श्रुतीची हत्या तिच्याच घरात होते. पहिला संशयित नोकर खेमपाल याचा मृतदेहही त्याच दिवशी टेरेसवर सापडतो. यात पोलीस तपास करतांना सी़डीआय ऑफिसरच्या भूमिकेत अश्विन कुमार (इरफान खान) दिसतोय. चित्रपटात हत्येचा तीन प्रकारानं तपास दाखविण्यात आलाय.

पटकथा
चित्रपटाची पटकथा स्वत: विशाल भारद्वाज यांनी लिहिलिय आणि आरुषी हत्या प्रकरणाच्या तपासात समोर आलेल्या प्रत्येक बाबींवर प्रकाश टाकण्याचं काम त्यांनी केलंय. चित्रपटात तीन वेगवेगळ्या निर्णयांवर विशेष टिप्पणी केली गेलीय. वडील-मुलगी, आई-मुलगी, आई-वडील, आई-वडील-मुलगी आणि नोकर या सर्वांना चित्रपटात पाहून वाटतं यासाठी खूप रिसर्च केला गेलाय. पटकथेच्या बाबतीत चित्रपट कुठेच कमी पडत नाही. अखेरच्या १२ मिनीटं अधिक मनोरंजक वाटतात. काही डायलॉग आपल्याला हसण्यासही भाग पाडतात. 

या चित्रपटाचं सर्वात मोठं यश म्हणजे यातील कलाकार... एकाहून एक असे सरस कलाकार यात आहेत... इरफान खान, नीरज कबी, कोंकणा सेन यांनी जबरदस्त अभिनय केलाय. तर स्पेशल रोलमध्ये तब्बू आपली छाप सोडून जाते. एका वडिलांचा अभिनय करणारे नीरज कबी आणि आई दर्शवणारी कोंकणा दोघांनीही खूप हृदयस्पर्शी अभिनय केलाय. इरफानची पोलीस ऑफिसरची भूमिका मनावर छाप सोडते. 

संगीत
चित्रपटात संगीत महत्त्वाची भूमिका बजावतंय. गुलजार यांनी लिहिलेली आणि विशाल भारद्वाज यांनी संगीतबद्ध केलेलं संगीत कथानकाला पुढे नेण्यास मदत करतं. यात लिप सिंक वालं कोणतंही गाणं नाहीय. पण बॅकग्राऊंडला असलेला आलाप आपल्याला कथेसोबत बांधून ठेवतो. तर रेखा भारद्वाज यांनी गायलेलं गाणं मनाला स्पर्शून जातं.

कमी
जेव्हा चित्रपटात तपास एका ठिकाणहून दुसरीकडे स्विच होतो, तेव्हा तिसऱ्या वेळचा तपास जरा कमजोर वाटतो. इरफान खानच्या तपासानंतर अतुल कुमारचा तपास कमी पडतो.

चित्रपट का पाहावा
जबरदस्त अभिनय, सत्य घटनेवर आधारित चित्रपट असला तरी तो आपल्याला बांधून ठेवतो. आपल्याला विचार करायला भाग पाडणारा चित्रपट आहे 'तलवार'... अभिनय, कथानकसाठी हा चित्रपट नक्की पाहावा... 

आणखी वाचा - VIDEO : आरुषि हत्याकांडावर आधारित 'तलवार'चा ट्रेलर

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.