'तारक मेहता का उल्टा चष्मा'नं रचलाय राष्ट्रीय रेकॉर्ड... 'लिम्का'नं घेतली दखल

नुकतीच 'बालिका वधू' या कार्यक्रमानं सर्वाधिक काळ सुरू असणारा कार्यक्रम म्हणून 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये एन्ट्री मिळवली होती. आता आणखी एका कार्यक्रमानं राष्ट्रीय रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय. 

Updated: Jun 3, 2016, 07:24 PM IST
'तारक मेहता का उल्टा चष्मा'नं रचलाय राष्ट्रीय रेकॉर्ड... 'लिम्का'नं घेतली दखल title=

मुंबई : नुकतीच 'बालिका वधू' या कार्यक्रमानं सर्वाधिक काळ सुरू असणारा कार्यक्रम म्हणून 'लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड'मध्ये एन्ट्री मिळवली होती. आता आणखी एका कार्यक्रमानं राष्ट्रीय रेकॉर्डमध्ये आपलं नाव नोंदवलंय. 

'तारक मेहता का उल्टा चष्मा' या कार्यक्रमानं 'सर्वाधिक काळ चालणारा कल्पनात्मक कॉमेडी कार्यक्रम' म्हणून लिम्कामध्ये रेकॉर्ड कायम केलाय. 

 

२८ जुलै २००८ पासून या कार्यक्रमाचं प्रसारण सब टीव्हीवर सुरु झालं होतं. २२ जून २०१५ रोजी या कार्यक्रमाचा १७०० वा भाग टीव्हीवर प्रसारित झाला होता.