व्हिडिओ: 'बजरंगी भाईजान' पाहून 'ती' हमसून-हमसून रडली

सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'चा जलवा अजूनही कायम आहे. या चित्रपटानं लहान मुलांचंही मन जिंकलंय. नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ लिंक शेअर केलीय. 

Updated: Jul 24, 2015, 01:32 PM IST
व्हिडिओ: 'बजरंगी भाईजान' पाहून 'ती' हमसून-हमसून रडली title=

मुंबई: सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान'चा जलवा अजूनही कायम आहे. या चित्रपटानं लहान मुलांचंही मन जिंकलंय. नुकताच चित्रपटाचे दिग्दर्शक कबीर खान यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ लिंक शेअर केलीय. 

यात कबीर खान यांनी लिहिलंय की, 'माझा चित्रपट पाहून या छोट्या मुलीची रिअॅक्शन पाहून मी भावूक झालोय.'

या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी आपल्या आईच्या मांडीवर बसून रडत सलमानला भेटायचं म्हणतेय. मुलीची ही रिअॅक्शन सलमानचा चित्रपट 'बजरंगी भाईजान' पाहून आलीय. ती रडत-रडत आपल्या आईला सलमान खानला भेटायचं म्हणतेय. मुलीचं नाव सूझी असल्याचं सांगण्यात येतंय. 

पाहा हा व्हिडिओ - 

 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.