'म्हणून ऋतिकबरोबर घटस्फोट घेतला'

बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझेन खाननं 2014 मध्ये घेतलेल्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला होता.

Updated: Jun 11, 2016, 10:16 PM IST
'म्हणून ऋतिकबरोबर घटस्फोट घेतला' title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता ऋतिक रोशन आणि सुझेन खाननं 2014 मध्ये घेतलेल्या घटस्फोटामुळे अनेकांना धक्का बसला होता. 17 वर्ष संसार केल्यानंतर या दोघांनी वेगळं व्हायचा निर्णय घेतला. 

सुझेन आणि अर्जुन रामपाल यांच्यामधल्या वाढत्या मैत्रीमुळे ऋतिक-सुझेननं घटस्फोट घेतल्याच्या चर्चा झाल्या. आता खुद्द सुझेननंच घटस्फोटाबाबत मौन सोडलं आहे. एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सुझेननं घटस्फोटाचं कारण सांगितलं आहे. 

आम्ही नात्याच्या त्या टप्प्यावर पोहोचलो होतो त्यामुळे आम्ही वेगळं व्हायचा निर्णय घेतला. चुकीच्या नात्यांमध्ये माणसानं नसावं याची जाणीव प्रत्येकालाच असायला हवी. आजही आम्ही चांगले मित्र आहोत, आम्ही बाहेर फिरायला जात नसलो तरी एकमेकांशी अजूनही बोलतो, असं सुझेन म्हणाली आहे.

मुलांची आम्हाला दोघांनाही काळजी आहे. जेव्हा मुलांचा मुद्दा येतो तेव्हा आम्ही दोघं आमच्यातले मतभेद बाजूला ठेवतो, अशी प्रतिक्रिया सुझेननं दिली आहे.