पाहा, 'कबाली' सिनेमातला रजनीकांतचा गँगस्टर लूक!

अभिनेता रजनीकांतच्या नव्या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीय. रजनीकांतचा आगामी चित्रपट 'कबाली'मध्ये तो एका वेगळ्याच लूकमध्ये दिसतोय. 

Updated: Sep 16, 2015, 10:16 PM IST
पाहा, 'कबाली' सिनेमातला रजनीकांतचा गँगस्टर लूक! title=

मुंबई : अभिनेता रजनीकांतच्या नव्या सिनेमाची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिलीय. रजनीकांतचा आगामी चित्रपट 'कबाली'मध्ये तो एका वेगळ्याच लूकमध्ये दिसतोय. 

कबाली या चित्रपटात रजनीकांत एका गँगस्टरच्या भूमिकेत दिसणार आहेत. याच सिनेमाचा फर्स्ट लूक आज प्रदर्शित करण्यात आलाय. 

यावेळी, रजनीकांत आपल्या सफेद दाढी आणि थ्री पीस सूटमध्ये दिसला. सिनेमाशी निगडीत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत गेल्या आठवड्यात सिनेमाच्या फोटोशूटमध्ये सहभागी झाला होता. यावेळीही तो पांढऱ्या दाढी-मिशांसहीत दिसला होता.

रजनीकांत आपल्या वयाशी साधर्म्य साधणाऱ्या आणि चेन्नईला राहणाऱ्या एका गँगस्टरची या सिनेमात भूमिका साकारतोय. 

या सिनेमाचं शूटींग गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर म्हणजेच १७ सप्टेंबर रोजी चेन्नईमध्ये सुरूवात होणार आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.