सनी लिओन आई होणार

बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनने आई होण्याची इच्छा व्यक्त केलीये. सनी लिओन आणि तिचा पती डॅनियल वेबर गेल्या अनेक दिवसांपासून मुलाला जन्म देण्याबाबत विचार करत होते. मात्र बिझी शेड्यूल्डमुळे सनीला तिच्या कामातून वेळ मिळत नव्हता. 

Updated: Dec 14, 2015, 01:27 PM IST
 सनी लिओन आई होणार title=

नवी दिल्ली : बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनने आई होण्याची इच्छा व्यक्त केलीये. सनी लिओन आणि तिचा पती डॅनियल वेबर गेल्या अनेक दिवसांपासून मुलाला जन्म देण्याबाबत विचार करत होते. मात्र बिझी शेड्यूल्डमुळे सनीला तिच्या कामातून वेळ मिळत नव्हता. 

'मला आणि डॅनियलला आता मूल हवंय. आम्ही दोघं केवळ योग्य वेळेच्या प्रतीक्षेत होतो,' असे सनीने सांगितले. तसेच सनीची सासूलाही नातवंड हवयं. याची तक्रारही तिने केलीय. यामुळे आता अधिक उशीर नको म्हणून सनीनेही बाळाबाबत विचार सुरु केलाय.

लवकरच सनीची मस्तीजादे चित्रपट प्रदर्शित होत आहेय. नव्या वर्षात २७ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. यात सनी डबल रोलमध्ये पाहायला मिळेल. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.