मुंबई : सलमान खान लहान मुलांप्रमाणे निरागस आहेत. जेव्हा आम्ही शूटिंग करायचो तेव्हा ब्रेक मध्ये ते खुप मस्ती करायचे. सलमान आणि माझ्यात एक घट्ट नातं तयार झालं आहे. शूटिंगनंतरही आम्ही खूप गप्पा मारायचो, असे सुप्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने म्हटले आहे.
अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी बॉलीवुडमधील मोठ्या अभिनेत्यांसोबत सध्या काम करत आहे. ते सध्या त्यांच्या ‘बजरंगी भाईजान’ मुळे चर्चेत आहेत.
मला जाणवले की, सलमानमध्ये एक लहान मूल आहे. नवाजुद्दीन लवकरच ‘मांझी’ मध्ये दिसणार आहे.
या चित्रपटात त्याच्याविरूद्ध राधिका आपटे आहे. नवाजुद्दीनने चित्रपटात मुख्य भूमिका साकारली आहे. हा चित्रपट बिहारच्या एका साधारण व्यक्तीच्या असाधारण कथेवर आधारित आहे. ही कथा समर्पणवर आधारित आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.