मीडिया दरदिवशी हिरो-व्हिलन तयार करते - शाहरुख खान

बॉलीवूड बादशहा शाहरुख खानने मीडियावर आगपाखड केली आहे. मीडिया दररोज हिरो किंवा व्हिलन तयार करते. आणि जर त्यांच्याकडे तसं काही नसेल. तर कोणाला तरी हिरो किंवा व्हिलन बनवण्यासाठी काहीतरी असावं. याचा ते प्रयत्न करतात, अशी टीका शाहरूखने केली आहे. 

Updated: Apr 4, 2016, 03:38 PM IST
मीडिया दरदिवशी हिरो-व्हिलन तयार करते - शाहरुख खान title=

मुंबई : बॉलीवूड बादशहा शाहरुख खानने मीडियावर आगपाखड केली आहे. मीडिया दररोज हिरो किंवा व्हिलन तयार करते. आणि जर त्यांच्याकडे तसं काही नसेल. तर कोणाला तरी हिरो किंवा व्हिलन बनवण्यासाठी काहीतरी असावं. याचा ते प्रयत्न करतात, अशी टीका शाहरूखने केली आहे. 

माझ्यासाठी 24 तास काम करणारा माझा ड्रायव्हरी हिरो आहे. स्पेशल असणं स्पेशल नसतं असं सांगत शाहरुखने मीडियावर टीकास्त्र सोडलं. तुम्हा फॉलो करण्यासाठी कुणी आदर्श असण्याची गरज काय ? असा सवालही शाहरुखने केला आहे.

मीडिया कोण वाईट आणि कोण चांगलं याबद्दल स्वत:च गाजावाजा करत असतं. कोणी आपला हिरो किंवा आदर्श असावं हे फक्त दोन गोष्टींवर अवलंबून असतं. जो कोणी तुमच्यासारखा असेल किंवा ज्याच्यासारखं तुम्हाला बनायचं आहे. तुम्ही आजूबाजूला पाहिलंत तर हिरोंची कमतरता नाही, असंही शाहरूखने म्हटलंय.