'फौजी' शाहरुख २५ वर्षांनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान यांची एकेकाळी प्रचंड गाजलेली 'फौजी' ही मालिका पुन्हा झी लम्हे चॅनलवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ही मालिका  ९ नोव्हेंबरपासून संध्याकाळी ७.३०  वाजता प्रसारित केली जाईल.

Updated: Nov 9, 2014, 04:54 PM IST
'फौजी' शाहरुख २५ वर्षांनंतर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला  title=

मुंबई : बॉलीवूडचा बादशहा शाहरुख खान यांची एकेकाळी प्रचंड गाजलेली 'फौजी' ही मालिका पुन्हा झी लम्हे चॅनलवर प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. ही मालिका  ९ नोव्हेंबरपासून संध्याकाळी ७.३०  वाजता प्रसारित केली जाईल.
 
 आता तब्बल २५ वर्षांनंतर या मालिकेतील  शाहरुख पुन्हा प्रेक्षकांना पाहता येणार आहे. न्यू फिल्म अॅडिक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने या मालिकेची निर्मिती केलीय. तर कर्नल राज कपूर यांनी 'फौजी'चं दिग्दर्शन केलंय.
 
भारतीय लष्कराच्या कमांडोचं ट्रेनिंग कसं असतं, यावर ही मालिका आधारित होती. डीडी नॅशनल चॅनलवर १९८९ साली आलेल्या 'फौजी' मालिकेने छोट्या पडद्यावर धूम माजवली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.