बॉलीवूडच्या रॉकस्टार रणबीरला 7 वर्षे पूर्ण

Updated: Nov 9, 2014, 04:48 PM IST
बॉलीवूडच्या रॉकस्टार रणबीरला 7 वर्षे पूर्ण  title=

 

नवी दिल्ली: अभिनेता रणबीर कपूरने  9 नोव्हेंबर 2007 साली ` सावरियां ‘ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. रणबीरच्या टॉवेल डान्सने सगळ्यांनाच वेड लागले होते.

आज रणबीर कपूरची बॉलीवूडमध्ये 7 वर्षे पूर्ण झाली.

रणबीरने सुरूवातीपासूनच त्याच्या अभिनय आणि अदाकारीने लोकांना वेड लावले. `बचना ऐ हसीनो‘ ची प्ले बॉय ईमेज तसेच रणबीरचा बर्फी रोल तर प्रेक्षकांना खूप भावला. इम्तियाज अलींचा रॉकस्टार ह्या चित्रपटाने रणबीरच्या करिअरचा टर्निंग पॉईंट ठरला. `ये जवानी हे दिवानी’ या चित्रपटातील कॅमेरामॅनच्या भूमिकेचंही खुप कौतूक झाले. रणबीरने सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या मनात एक ठसा उमटवलाय.  

रणबीरला त्याच्या पुढील करिअरसाठी लाख लाख शुभेच्छा... 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.