न्यूयॉर्क : जगातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सेलिब्रिटींची २०१६ मधील यादी 'फोर्ब्स'ने जाहीर केली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि स्टंट अभिनेता अक्षय कुमार हे सर्वाधिक मानधन घेणारे कलाकार असल्याचं फोर्ब्सने म्हटलंय.
अमेरिकेची प्रसिद्ध गायिका टेलर स्विफ्टने पहिले स्थान पटकाविले आहे. टेलर स्विफ्टचं मानधन १७ कोटी डॉलर आहे.
स्टंटसाठी प्रसिद्ध असलेल्या अक्षय कुमारच्या क्रमांकात यावर्षी घसरण झाली आहे. २०१५मधील यादीत तो ७६व्या स्थानावर होता.यंदा तो ९४ व्या स्थानावर गेला आहे. अक्षय हा बॉलिवूडमधील सर्वांत व्यस्त हिरो आहे. अक्षयने ३ हीट चित्रपटांमधून त्याने सर्वाधिक कमाई केली असल्याचे 'फोर्ब्स'ने म्हटले आहे.
शाहरुखने गेल्या काही वर्षांत अनेक हिट चित्रपट दिले आहेत, बॉक्स ऑफिसवर अजूनही त्याची चलती असल्याचे दिसते असे 'फोर्ब्स'ने म्हटले आहे.
शाहरुख खान ३ कोटी ३० लाख डॉलर मानधनासह यादीत ८६ व्या स्थानावर आहे, तर अक्षय कुमार तीन कोटी १५ लाख डॉलरसह ९४ व्या क्रमांकावर आहे.
एका चित्रपटासाठी शाहरुख लाखो डॉलर कमवीत असून चित्रपटातील भूमिकेसाठी तो कष्टही घेतो, अशा शब्दात त्याचे कौतुक केले आहे. चित्रपटाशिवाय अनेक कंपन्यांच्या जाहिराती तो करीत असून त्यातील अनेक अमेरिकन ब्रॅंड आहेत. यातून शाहरुखची मोठी कमाई होते, असेही म्हटले आहे.