मुंबई : अक्सर 2 या चित्रपटामधून भारताचा माजी फास्ट बॉलर एस. श्रीसंत बॉलीवूडमध्ये आगमन करणार आहे. अक्सर 2 च्या शूटिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. अभिनेत्री झरीन खाननं या चित्रपटाच्या शूटिंगचे काही फोटो ट्विटरवरून शेअर केले आहेत.
इम्रान हाश्मी, उदिता गोस्वामी आणि दिनो मोरिया यांची प्रमुख भूमिका असलेला अक्सर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाला होता. अनंत महादेवन यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
अक्सर 2 चं दिग्दर्शनही अनंत महादेवनच करणार आहेत. माझ्या नव्या चित्रपटाच्या शूटिंगची चांगली सुरुवात झाली आहे, असं ट्विट श्रीसंतनं केलं आहे.
Great to start my new movie ..amazing unit..#aksar2 pic.twitter.com/NPe7XPhqCX
— Sreesanth (@sreesanth36) July 7, 2016