"क्या मिल गया सरकार तुम्हे एमर्जन्सी लगा कें?"

भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणीची घोषणा केली होती, तेव्हा आणीबाणीचे पडसाद बॉलीवूडमध्येही दिसून आले होते. 

Updated: Jun 29, 2015, 08:12 PM IST
"क्या मिल गया सरकार तुम्हे एमर्जन्सी लगा कें?" title=

मुंबई : भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी भारतात आणीबाणीची घोषणा केली होती, तेव्हा आणीबाणीचे पडसाद बॉलीवूडमध्येही दिसून आले होते. 

तेव्हा आणीबाणीनंतर १९७८ साली आयएस जौहर या दिग्दर्शकानं नसबंदी सिनेमाची निर्मिती केली. आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांनी जबरदस्तीने काही लोकांना पकडून त्यांची नसबंदी केली होती, त्यावर हा सिनेमा काढण्यात आला.

या सिनेमात प्रसिद्ध कवी हुल्लड मुरादाबादीच्या गीतावर, क्या मिल गया सरकार तुम्हे एमर्जन्सी लगा के, हे गाणं चित्रित करण्यात आलं होतं, हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं होतं. 

हे गीत महेंद्र कपूर, मन्ना डे यांनी गायलं होतं.लोकसंख्या वाढ थांबवण्यासाठी संजय गांधी यांनी ही जबरदस्तीची नसबंदी सुरू केली होती, त्यावेळी संजय गांधी २९ वर्षांचे होते, त्यांच्याकडे युवक काँग्रेसची धुरा होती. काही लोकांना तर ५ किलोच्या डालडा तुपाचं आमिष दाखवूनही नसबंदी करण्यात आली होती.

पाहा हे सुपर हिट गाणं, "क्या मिल गया सरकार तुम्हे एमर्जन्सी लगा कें"

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.