‘अमृता प्रीतम’ यांच्या भूमिकेत सोनाक्षी

बॉलिवूडच दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचं आता एक वेगळंच रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे. कारण प्रसिद्ध साहित्यिक आणि कवयित्री अमृता प्रीतम यांची भूमिका निभावण्याचा ती प्रयत्न करणार आहे. 

Updated: Oct 14, 2014, 03:37 PM IST
‘अमृता प्रीतम’ यांच्या भूमिकेत सोनाक्षी title=

मुंबई : बॉलिवूडच दबंग गर्ल सोनाक्षी सिन्हाचं आता एक वेगळंच रुप प्रेक्षकांसमोर येणार आहे. कारण प्रसिद्ध साहित्यिक आणि कवयित्री अमृता प्रीतम यांची भूमिका निभावण्याचा ती प्रयत्न करणार आहे. 

एखाद्या ‘बायोपीक’मध्ये काम करण्याचा सोनाक्षीचा हा पहिलाच अनुभव असेल. मिळालेल्या माहितीनुसार, आशी दुआ यांनी अमृता प्रीतम यांच्या भूमिकेसाठी अगोदर प्रियांका चोपडाला विचारणा केली होती. पण, प्रियांकानं नुकतचं बॉक्सर मेरी कॉम हिच्या भूमिका पार पाडलीय. दर्शकांनी आणि सिनेपरीक्षकांनी प्रियांकाचं या भूमिकेसाठी खूप कौतुकही केलंय. परंतु, मेरी कॉमच्या भूमिकेनंतर अमृता प्रीतम यांची भूमिका करण्यास प्रियांकानं नकार दिला. 

त्यानंतर, आशी यांनी सोनाक्षीला या भूमिकेबाबत विचारणा केली... आणि सोनाक्षीनं या भूमिकेसाठी आपला होकार कळवल्याचंही समजतंय. 

सोनाक्षीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता हा सिनेमाच्या केवळ साईन करणं बाकी आहे... परंतु, सोनाक्षी या भूमिकेसाठी खूपच उत्सुक आहे.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.