Box Office: पहिल्याच विकेंडमध्ये 'सिंघम रिटर्न्स' ची कमाई 78 कोटींहून अधिक

अजय देवगण आणि करीना कपूर-खानच्या ‘सिंघम रिटर्न्स’नं आपल्या पहिल्याच आठवड्यात धमाकेदार कमाई केलीय. रिलीजच्या दिवशीच शुक्रवारी चित्रपटानं 32 कोटींची कमाई केली. 

Updated: Aug 18, 2014, 04:30 PM IST
Box Office: पहिल्याच विकेंडमध्ये 'सिंघम रिटर्न्स' ची कमाई 78 कोटींहून अधिक title=

नवी दिल्ली: अजय देवगण आणि करीना कपूर-खानच्या ‘सिंघम रिटर्न्स’नं आपल्या पहिल्याच आठवड्यात धमाकेदार कमाई केलीय. रिलीजच्या दिवशीच शुक्रवारी चित्रपटानं 32 कोटींची कमाई केली. 

शनिवारी कमाई वाढून झाली 20-21 कोटी आणि रविवारी 26-27 कोटींचा बिझनेस सिंघम रिटर्न्सनं केला. म्हणजे अवघ्या तीन दिवसांत 78 कोटींहून अधिकची कमाई केलीय.

100 कोटींच्या क्लबमध्ये येण्यासाठी सिंघमला आता जास्त वेळ लागणार नाहीय. सलमानचा ‘किक’, आमीरचा ‘धूम-3’ आणि शाहरूखच्या ‘चेन्नई एक्स्प्रेस’चा रेकॉर्ड सिंघम रिटर्न्स तोडण्याची शक्यता आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.