सलमान प्रकरणी गायक अभिजितने तोडले अकलेचे 'चांद तारे'

गायक अभिजीत भट्टाचार्यने ट्वीटरवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रस्त्यावर झोपणे हे आत्महत्या करण्यासारखं आहे. 

Updated: May 6, 2015, 02:55 PM IST
सलमान प्रकरणी गायक अभिजितने तोडले अकलेचे 'चांद तारे' title=

मुंबई  : जो रस्ते पे सोयेगा वो, कुत्ते की मौत मारा जायेगा, असं गायक अभिजीत भट्टाचार्यने ट्वीटरवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. रस्त्यावर झोपणे हे आत्महत्या करण्यासारखं आहे. 

जे फुटपाथवर झोपतात ते मुर्ख असतात, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे. तसेच पुढे अभिजितने असंही म्हटलं आहे की, मला वर्षभर घर नव्हतं, तरीही मी काही रस्त्यावर झोपलो नव्हतो.

तसेच कुत्रा जर रोडवर झोपेल, तर कुत्र्याप्रमाणेच मारला जाईल. अभिजितने म्हटलं आहे की, रस्ता गरिबांच्या बापाचा नाही.रस्ता कार आणि कुत्र्यांसाठी आहे, माणसांसाठी नाही.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.