मुंबई: गायक अभिजीतनं पुन्हा वादग्रस्त ट्विट केलंय. आज मुंबई बॉम्बस्फोटाचा आरोपी याकूब मेमनला फासावर लटकवण्यात आलं. पण जेव्हा बुधवारी मध्यरात्री त्याच्या फाशीच्या स्थगितीसाठी प्रयत्न सुरू होते. त्या प्रकरणावर अभिजीतनं वादग्रस्त ट्विट केलं.
याकूबच्या फाशीला स्थगिती मिळण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या प्रशांत भूषण यांना फाटक्या चपलेनं मारलं पाहिजे, असं वादग्रस्त ट्विट त्यानं केलं.
अभिजीतच्या एका चाहत्यानं प्रशांत भूषणबद्दल काय म्हणाल? असा प्रश्न विचारला. तेव्हा आक्षेपार्ह भाषेचा वापर केला.
अभिजीतनं ट्विट केलं, 'भूषण यांना फाटक्या चपलेने मारेन. पण भूषण यांना मारण्यासाठी आता त्यांची वेळ घ्यावी लागेल, कारण देशातील अनेकजण भूषण यांना मारण्यासाठी रांगेत उभे आहेत. प्रसारमाध्यमांनी त्यांचे कॅमेरे तयार ठेवावेत असंही त्यांनी एका पत्रकाराला टॅग करत म्हटलं आहे."
यापूर्वी सलमानच्या 'हिट अँड रन' केसच्या निकालानंतरही अभिजीतनं असंच वादग्रस्त ट्विट केलं होतं.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.