रॅम्बो सिनेमाचा हिंदी रिमेक बनणार

ऐंशीच्या दशकात संपूर्ण जगाला आपल्या अॅक्शनने वेड लावलेल्या सिल्व्हेस्टर स्टॅलोनच्या रॅम्बो या सिनेमाचा हिंदी रिमेक बनणार आहे. 

Updated: Feb 2, 2016, 07:33 AM IST
रॅम्बो सिनेमाचा हिंदी रिमेक बनणार title=

मुंबई : ऐंशीच्या दशकात संपूर्ण जगाला आपल्या अॅक्शनने वेड लावलेल्या सिल्व्हेस्टर स्टॅलोनच्या रॅम्बो या सिनेमाचा हिंदी रिमेक बनणार आहे. 

टॉम क्रूझच्या 'नाइट अॅण्ड डे'चा हिंदी रिमेक तयार केल्यानंतर आता सिध्दार्थ आनंद लवकरचं रॅम्बोची हिंदी आवृती काढणार आहे. सिल्व्हेस्टर स्टॅलोनने आता रॅम्बो चित्रपटातून निवृती घेतली आहे.

त्यामुळे बॉलिवूडमध्ये ती फ्रॅंचाईजी सुरु करण्याची ही अगदी योग्य वेळ असल्याचे सिध्दार्थचं म्हणणं आहे..सिनेमात ह्रतिक रोशन रॅम्बोची भूमिका साकारण्याची शक्यता असून ह्रतिक सोबत चित्रपटाबद्दल बोलणी सुरु असल्याचं सिध्दार्थने स्पष्ट केलं आहे.