सिद्धार्थ माल्याच्या आयुष्यात 'जन्नत' क्वीन!

'लीकर किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय माल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या याचं नाव आता एका नव्या बॉलिवूड अभिनेत्रीशी जोडलं जातंय.

Updated: Jan 15, 2016, 07:38 PM IST
सिद्धार्थ माल्याच्या आयुष्यात 'जन्नत' क्वीन! title=

मुंबई : 'लीकर किंग' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विजय माल्ल्या यांचा मुलगा सिद्धार्थ माल्या याचं नाव आता एका नव्या बॉलिवूड अभिनेत्रीशी जोडलं जातंय.

सध्या, सिद्धार्थ माल्ल्या 'जन्नत'फेम बॉलिवूड अभिनेत्री सोनल चौहान हिच्यासोबत अधिक वेळ व्यतीत करताना दिसतोय. उल्लेखनीय म्हणजे सिद्धार्थच्या आयुष्यात सोनल ही काही पहिलीच अभिनेत्री नाही... या अगोदर त्याचं नाव दीपिका पादूकोण आणि अमिषा पटेल यांच्यासोबतही जोडलं गेलंय. 

सिद्धार्थनं सोनलसोबतचे आपले अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलंत. दोघांना लंडन आणि गोव्यात एकत्र पाहिलं गेलंय. त्यामुळे या दोघांचं नात मैत्रीपेक्षा पुढे गेलंय, अशी चर्चा सुरू आहेत.  

इमरान हाश्मीसोबत पहिल्यांदा 'जन्नत' या सिनेमात दिसलेली सोनल एक मॉडेल आहे आणि ती अनेक जाहिरातींमध्येही दिसलीय.