मुंबई : श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी लवकरच बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार असल्याची चर्चा आहे. मात्र, श्रीदेवी जान्हवीच्या वागणुकीमुळे चांगलीच वैतागली आहे. याचा परिणाम म्हणजे तिने जान्हवीवर अनेक बंधने लादली आहेत.
जान्हवीचा बॉयफ्रेण्ड शिखर पहरिया यामुळे श्रीदेवी चांगलीच वैतागली आहे. काही दिवसांपूर्वी जान्हवी आणि शिखर एकमेकांना किस्स करतानाचे फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले होते. हेच फोटो श्रीदेवीच्या नाराजीचे कारण ठरले आहे.
श्रीदेवीला जान्हवीची शिखरसोबत असलेली मैत्री अजिबात पसंत नाही. केवळ शिखरच नाही तर करिअरच्या या टप्प्यावर कुठल्याही मुलाच्या फंदात पडू नको, असा दमच तिने म्हणे मुलीला दिलाय. सध्या श्रीदेवी जान्हवीला कुठेही एकटी जाऊ देत नाही. जान्हवीला मित्र-मैत्रिणीसोबत फिरण्यासही तिने प्रतिबंध घातला आहे.