मुंबई : माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्या प्रेमकथेवर एक शॉर्ट फिल्म बनणार आहे. अभिनेता करनवीर बोहरा यांच्यावर एक सिनेमा करणार आहे.
करनवीर त्याच्या या सिनेमातून राजीव गांधी आणि सोनिया गांधी यांच्यातील मैत्री ते प्रेम यावर सिनेमा करत आहेत. राजीव गांधी यांची भूमिका स्वत: करनवीर करणार आहे तर सोनिया गांधीचा रोल 'जज्बा' सिनेमातील अभिनेत्री प्रिया बॅनर्जी करणार आहे. या शॉर्ट फिल्मचं नाव असणार आहे 'इजाजत'.
करनवीरच्या मते त्याला राजीव आणि सोनिया गांधी यांची प्रेमकथा खूप आवडली. त्यामुळे या विषयावर त्याने सिनेमा करण्याचं ठरवलं. सिनेमात राजीव आणि सोनिया गांधी यांची पहिली भेट, त्यानंतरची मैत्री आणि मग प्रेम याबाबत चित्रीकरण करण्यात येणार आहे. राजीव गांधी जेव्हा त्यांच्या प्रेमाविषयी त्यांच्या आई इंदिरा गांधी यांना सांगतात त्यावर हा सिनेमा समाप्त होतो.