प्रत्युषा गर्भवती होती, डॉक्टरांनी केलं स्पष्ट

छोट्या पडद्यावरची अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूनंतर आता जेजे हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. 

Updated: Apr 19, 2016, 11:01 AM IST
प्रत्युषा गर्भवती होती, डॉक्टरांनी केलं स्पष्ट title=

मुंबई : छोट्या पडद्यावरची अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी हिच्या मृत्यूनंतर आता जेजे हॉस्पीटलच्या डॉक्टरांनी एक धक्कादायक खुलासा केलाय. 

२४ वर्षांची प्रत्युषा हे गर्भवती होती... मृत्यूच्या काही दिवस अगोदरच तिनं आपलं अॅबॉर्शन करून घेतलं असावं, असं डॉक्टरांनी स्पष्ट केलंय. प्रत्युषाच्या पोस्टमॉर्टेमनंतर काही टिश्युंची तपासणी केल्यानंतर सोमवारी ही गोष्ट डॉक्टरांनी जाहीर केलीय.

परंतु, प्रत्युषा नेमकी कुणापासून गर्भवती राहिली होती, याची खात्री करण्याकरता पोलिसांना अनेक अडचणी येऊ शकतात. यासाठी डीएनए चाचणीही केली जाऊ शकते. डीएनए चाचणीसाठी प्रत्युषाचे केस, नखं आणि रक्ताचे काही सॅम्पल्सही जपून ठेवल्याचं डॉक्टरांनी म्हटलंय. 

प्रत्युषाचा मृतदेह २ एप्रिल रोजी तिच्या राहत्या घरी सापडला होता. ती अभिनेता - प्रोड्युसर राहुल राज सिंग याच्यासोबत नातेसंबंधात होती.