लेखिका 'शोभा डे' यांना हक्कभंगाची नोटीस

लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना नेते प्रतापसरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत मांडला, यानुसार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शोभा डे यांना हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे, एका आठवड्याच्या आता डे यांना या नोटीसचं उत्तर द्यावं लागणार आहे.

Updated: Apr 12, 2015, 01:55 PM IST
लेखिका 'शोभा डे' यांना हक्कभंगाची नोटीस title=

मुंबई : लेखिका शोभा डे यांच्याविरोधात शिवसेना नेते प्रतापसरनाईक यांनी हक्कभंग प्रस्ताव विधानसभेत मांडला, यानुसार विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी शोभा डे यांना हक्कभंगाची नोटीस पाठवली आहे, एका आठवड्याच्या आता डे यांना या नोटीसचं उत्तर द्यावं लागणार आहे.

मल्टीप्लेक्समध्ये प्राईमटाईमला मराठी सिनेमा दाखवण्याबद्दल महाराष्ट्र सरकारच्या निर्णयावर शोभा डे यांनी आक्षेपार्ह ट्वीट केलं होतं, यावरून या शोभा डे यांच्याविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडण्यात आला.

शोभा डे यांच्या अशा वादग्रस्त वक्तव्यावरून, शिवसेना आणि राष्ट्रवादीने डे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली होती. शिवसेनेने डे यांच्याविरोधात मोर्चा काढून त्यांना वडा पाव आणि दहीमिसळ पाठवली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.