शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात मोठ्या पडद्यावर

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला आता दोन वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या झंझावाताची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संघर्षमय झंझावाती जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.  

Updated: Dec 15, 2014, 09:20 AM IST
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा झंझावात मोठ्या पडद्यावर title=

मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाला आता दोन वर्ष झाली आहेत. पण आजही त्यांच्या झंझावाताची आठवण प्रत्येकाच्या मनात आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा संघर्षमय झंझावाती जीवनप्रवास लवकरच मोठ्या पडद्यावर येणार आहे.  

येत्या २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुखांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावरील चित्रपट रिलीज केला जाणार असल्याची चर्चा आहे. सोशल मीडियाद्वारे याबद्दलची माहिती कळतेय. चित्रपटाचे निर्माते शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’चे संपादक संजय राऊत असल्याचं कळतंय. 

पक्षाच्या फेसबुक, ट्विटरवर बाळासाहेबांचे फोटो टाकून “तुमही बोलावलात। वाट पाहा, २३ जनवरी ला” असा मजकूर टाकण्यात आलाय. बाळासाहेबांच्या कारकिर्दीवर चित्रपट बनवला जाणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. मात्र चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार तसंच त्याबाबतची कोणतीही माहिती देण्यास त्यांनी नकार दिला.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बाळासाहेबांच्या जीवनावर एका लघुचित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टिशी जवळीक असणारे दिग्दर्शक हे या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचा नातू आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे या प्रकल्पाचे काम पाहत आहेत.   

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.