अभिनेता शशांक केतकरचा नवा बिझनेस

होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला श्री अर्थात अभिनेता शशांक केतकर आता अभिनायव्यतिरिक्त आणखी एका क्षेत्रात उतरलाय.

Updated: Oct 14, 2016, 12:58 PM IST
अभिनेता शशांक केतकरचा नवा बिझनेस title=

मुंबई : होणार सून मी या घरची या मालिकेतून घराघरांत पोहोचलेला श्री अर्थात अभिनेता शशांक केतकर आता अभिनायव्यतिरिक्त आणखी एका क्षेत्रात उतरलाय.

झी युवा वाहिनीवरील इथेच टाका तंबू या मालिकेत शशांक एका हॉटेलचा मालक आहे. मात्र मालिकेतील हा मालक आता खराखुरा मालक बनलाय. पुण्यामध्ये आईच्या गावात या नावाने शशांकने नवे हॉटेल सुरु केलंय.

शाकाहारींसाठी पुणेकरांना आईच्या गावात या हॉटेलच्या रुपाने नवा पर्याय उपलब्ध झालाय.