शशांक अर्थात 'श्री' दिसणार आता नव्या रुपात

झी मराठी वाहिणीवरील ‘होणार सून मी या घरची..’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला ‘श्री’ म्हणजेच शशांक केतकर नव्या अवतारात दिसतोय. मात्र, हा अवतार त्यांने ट्विटवर पोस्ट केलाय.

Updated: Apr 20, 2016, 07:23 PM IST
शशांक अर्थात 'श्री' दिसणार आता नव्या रुपात title=

मुंबई : झी मराठी वाहिणीवरील ‘होणार सून मी या घरची..’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेला ‘श्री’ म्हणजेच शशांक केतकर नव्या अवतारात दिसतोय. मात्र, हा अवतार त्यांने ट्विटवर पोस्ट केलाय.

शशांकचे हे रूप पाहून तुम्हाला धक्का बसला ना. त्याने हा फोटो मजेत ट्विटरवर शेअर केलाय बरं का? या फोटोखालील मेसेज वाचल्यानंतर या सगळ्याचा उलगडा होतो. मला माहिती आहे की, हे विचित्र आहे. पण, मेकअप रूममध्ये तुमच्या हाती अशाप्रकारचा केसांचा विग लागल्यानंतर असे घडते, असे शशांकने त्याच्या ट्विटरवर म्हटलेय.

काही दिवसांपूर्वी शशांकने ट्विटरवर प्रसिद्ध बालपणीचा फोटो शेअर केला होता. त्याची सोशल मीडियावर चर्चा होती. सध्या रंगभूमीवर शशांकचे ‘गोष्ट तशी गमतीची’ हे नाटक गाजतेय ‘वन वे तिकीट’ या चित्रपटातून तुमचा 'श्री' मोठ्या पडद्यावर दिसणार आहे.