करण जोहरच्या 'ये दिल है मुश्किल'मध्ये शाहरुख....

Updated: Aug 23, 2016, 12:58 PM IST
करण जोहरच्या 'ये दिल है मुश्किल'मध्ये शाहरुख.... title=

शाहरुख खान आणि करण जोहरची सुप्रसिद्ध जोडी 6 वर्षानंतर पुन्हा एकदा चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. 

2010 ला करण जोहर आणि शाहरुखचा 'माय नेम इज खान' हा सिनेमा आला होता. त्यानंतर शाहरुख आणि करण जोहरच्या मैत्रीत काहीतरीतरी बिनसलं असल्याची चर्चा बॅालिवूडमध्ये सुरू होती.  
 
या चर्चेला महत्त्व न देता, पुन्हा एकदा करण जोहरच्या येणाऱ्या 'ये दिल है मुश्किल' या सिनेमामध्ये शाहरुख महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

ही भूमिका आधी सैफ अली खान करणार होता, पण हाताला दुखापत झाल्यामुळे सैफ ऐवजी शाहरुख खान करणार असल्याची चर्चा आहे. अद्याप कोणीही याची पुष्टी केलेली नाही. जर शाहरुखने या सिनेमासाठी होकार दिला तर करण जोहर आणि शाहरुखचा हा पाचवा सिनेमा असेल.

 

करण जोहरच्या 'ये दिल है मुश्किल' सिनेमामध्ये शाहरुखबरोबर रणबीर कपूर, अनुष्का शर्मा, ऐश्वर्या राय-बच्चन असणार आहेत. 'ये दिल है मुश्किल'मध्ये शाहरुखची भूमिका लहान आहे. ही जोडी चाहत्यांच्या मनावर पुन्हा एकदा राज्य करेल का हे पाहाव लागेल.