मुंबई : शाहरुख खानचा 'रईस' आणि सलमान खानचा 'सुल्तान' हे दोन्ही सिनेमे २०१६ मध्ये ईदच्या दिवशी रिलीज होणार होते. पण आता हे दोन्ही सिनेमा एकाच दिवशी रिलीज होणार नाहीत. त्याला कारण ही तसंच आहे.
बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन्ही सिनेमे एकाच दिवशी रिलीज झाल्याने पहिल्या दिवसाचं कलेक्शन पाहता शाहरुखने आपला निर्णय बदल्याची चर्चा आहे. त्यामुळे शाहरुख खान हा ईदच्या आधीच रईस हा सिनेमा प्रदर्शित करेल अशीही चर्चा आहे.
बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित झाल्याने पहिल्या दिवशी दिलवालेने 21 कोटी तर बाजीराव मस्तानीने 12.80 कोटी कमावले. दुसऱ्या दिवशी मात्र बाजीराव मस्तानीची कमाई 25 टक्क्यांनी वाढली आणि 15 कोटी कमावले पण दिलवालेचा १ कोटींचा घाटा झाला. त्याने 20 कोटीच कमावले.
शाहरुख खानने हि परिस्थिती पाहता सलमान खानच्या सिनेमा सोबत त्याचा सिनेमा प्रदर्शित न करण्याचा निर्णय घेतला. 2016 मध्ये सलमानचा एकच सिनेमा प्रदर्शित होणार आहे आणि करण-अर्जूनमध्ये आता चांगली मैत्री ही झाली आहे. त्यामुळे मैत्री खातिर सिनेमा एकाच दिवशी रिलीज न करण्याचा निर्णय किंग खानला घ्यावा लागणार आहे.