शाहरुख खानला डॉक्टरेट पदवी जाहीर

अभिनेता शाहरुख खानला हैदराबादच्या मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे.

Updated: Dec 25, 2016, 08:57 PM IST
शाहरुख खानला डॉक्टरेट पदवी जाहीर title=

हैदराबाद : अभिनेता शाहरुख खानला हैदराबादच्या मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिव्हर्सिटीतर्फे डॉक्टरेट पदवी जाहीर करण्यात आली आहे. येत्या सोमवारी  म्हणजेच उद्या शाहरुख हैदराबादला विद्यापीठाने आयोजित केलेल्या या खास कार्यक्रमाला  उपस्थित राहणारे.

शाहरुखल डॉक्टरेट पदवी देण्यासाठी विद्यापीठाचा दीक्षांत समारंभ आयोजित करण्यात आलाय. यात अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते शाहरुखला डॉक्टरेटची पदवी प्रदान करण्यात येणारे. हैदराबादशी शाहरुखचं एक जिव्हाळ्याचं नातं आहे. शाहरुखची आई मुळची हैदराबादची आहे. त्यामुळे लहानपणीच्या अनेक आठवणी या शहराशी जोडल्या गेल्याचं शाहरुखने म्हटलंय.