स्वातंत्र्य दिनी शाहरुख-अक्षय भिडणार

15 ऑगस्ट 2017 ला अक्षय कुमारचा क्रॅक हा चित्रपट रिलीज होणार आहे.

Updated: Aug 26, 2016, 02:38 PM IST
स्वातंत्र्य दिनी शाहरुख-अक्षय भिडणार  title=

मुंबई : 15 ऑगस्ट 2017 ला अक्षय कुमारचा क्रॅक हा चित्रपट रिलीज होणार आहे. अक्षय कुमारबरोबरच शाहरुख खानही इम्तियाज अलीबरोबरचा त्याचा चित्रपट रिलीज करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. 

यंदाच्या वर्षी अक्षय कुमारचा रुस्तम आणि हृतिक रोशनचा मोहेनजो दारो एकाच दिवशी रिलीज झाले होते. यामध्ये अक्षयच्या रुस्तमनं बाजी मारली होती. त्यामुळे आता पुढच्या वर्षी अक्षय कुमार पुन्हा एकदा शाहरुखवर भारी पडतो का ही बाजी पलटते, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.