`मुलगी वाचवा` अभियान हेच `जीवती रै बेटी`चं लक्ष्य

महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध नेहमीच समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असतात. स्त्रीभ्रूणहत्येवर समाजात जागृती करण्याचं काम काही सामाजिक संघटना करत आहेत. यात भर पडावी म्हणून स्त्रीभ्रूणहत्येवर भाष्य करणारा `जीवती रै बेटी` हा हिंदी सिनेमा येणार आहे.

Updated: May 6, 2014, 02:18 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, राजस्थान
महिलांवर होणाऱ्या अत्याचाराविरूद्ध नेहमीच समाजामध्ये तीव्र पडसाद उमटत असतात. स्त्रीभ्रूणहत्येवर समाजात जागृती करण्याचं काम काही सामाजिक संघटना करत आहेत. यात भर पडावी म्हणून स्त्रीभ्रूणहत्येवर भाष्य करणारा `जीवती रै बेटी` हा हिंदी सिनेमा येणार आहे. या सिनेमात अभिनेत्री स्मिता बंसल ही महत्वाची भुमिका साकारणार आहे, तसेच `मुलगी वाचवा` हा संदेश सिनेमाद्वारे देण्यात येईल.
स्मिता बंसलने याआधी `बालिका वधू` या राजस्थानी कार्यक्रमात महत्वाची भुमिका साकारली होती. हा कार्यक्रम स्त्रियांच्या बाल विवाहावर आधारीत होता. स्मिताचा येणारा `जीवती रै बेटी` हा सिनेमा देखील राजस्थानी लोकजीवनावर आधारित असून, `मुलगी वाचवा` या अभियानाचा पुरस्कार करणारा आहे. सध्या राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये `मुलगी वाचवा` या अभियानाला जोर मिळत आहे. या कारणाने कुसुम काबरा यांनी या सिनेमाची कथा दिग्दर्शक आणि अभिनेता सनी अग्रवाल यांना सुचवली.
कुसुम काबरा गेले अनेक वर्ष `मुलगी वाचवा` या अभियानासाठी काम करत आहेत. सिनेमा हे जनजागृतीसाठी उत्तम साधन असल्यानेच कुसुम काबरा यांनी हा मार्ग स्वीकारला.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.