संजयची भेट घेण्यासाठी बॉलीवूड कलाकारांची रीघ

संजय दत्तची तुरुंगातून सुटका झाल्यापासून त्याला भेटण्यासाठी सेलिब्रेटींची रीघ लागलीय. 

Updated: Feb 28, 2016, 04:48 PM IST
संजयची भेट घेण्यासाठी बॉलीवूड कलाकारांची रीघ title=

मुंबई : संजय दत्तची तुरुंगातून सुटका झाल्यापासून त्याला भेटण्यासाठी सेलिब्रेटींची रीघ लागलीय. 

अभिषेक बच्चन, गोल्डी बहल, लक्ष्मी त्रिपाठीही त्याला भेटायला त्याच्या घरी येऊन गेले. अभिषेक बच्चन आणि संजय दत्त यांची भेट मात्र फार वेळ चालली. 

दुपारी चारच्या सुमाराला संजय दत्त आणि त्याची बहीण प्रिया दत्त दोघेही अभिषेक बच्चनला सोडायला आलेले. त्यावेळी सुटकेचा आनंद संजय दत्तच्या चेह-यावर स्पष्ट दिसत होता. मात्र या भेटीसंदर्भात अभिषेक बच्चनने काहीही बोलण्यास नकार दिला.