संजय दत्तचे आगामी हे ७ चित्रपट होणार प्रदर्शित

ऐरवडा जेलमधून सुटल्यानंतर संजय दत्तचं संपूर्ण बॉलिवूडने त्याचं स्वागत केलं. अनेकांनी त्याच्या घरी जाऊन त्याला शुभेच्छा दिल्या. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, शक्ती कपूर, संजय गुप्ता आणि विधू चोपडा हे कलाकार संजय दत्तच्या घरी पोहोचले. 

Updated: Feb 26, 2016, 05:30 PM IST
संजय दत्तचे आगामी हे ७ चित्रपट होणार प्रदर्शित title=

मुंबई : ऐरवडा जेलमधून सुटल्यानंतर संजय दत्तचं संपूर्ण बॉलिवूडने त्याचं स्वागत केलं. अनेकांनी त्याच्या घरी जाऊन त्याला शुभेच्छा दिल्या. शिल्पा शेट्टी, राज कुंद्रा, शक्ती कपूर, संजय गुप्ता आणि विधू चोपडा हे कलाकार संजय दत्तच्या घरी पोहोचले. 

संजय दत्त याचे आगामी ७ सिनेमे रिलीज होणार आहे. आगामी सिनेमाच्या शुटींगसाठी तयार झाला आहे. उन्हाळ्यात संजय दत्त हा त्याच्या आगामी सिनेमाचं शुटींग सुरू करणार आहे.

संजय दत्त याच्या सिनेमांवर ३५० कोटींचा जुगार लागला आहे. शेर, मुन्नाभाई चले अमेरिका, हंसमुख पिघल गया या आगामी सिनेमांचा यामध्ये समावेश आहे. 
डायरेक्टर सिद्धार्थ आनंद यांनी अॅक्शन फिल्म साइन केली आहे तर राजकुमार हिरानी हे संजय दत्तसोबत हे एक बायोपिक तयार करत आहेत. संजय दत्त याच्याकडे याशिवाय आणखी २ सिनेमे आहेत.