संजय दत्तने कमावलेले ४४० रुपये दिले मान्यताच्या हातात

अभिनेता संजय दत्त याने जेलमधून सुटका झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. घरात अवैधपणे शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त याला ५ वर्षाची शिक्षा झाली होती.

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 25, 2016, 05:57 PM IST
संजय दत्तने कमावलेले ४४० रुपये दिले मान्यताच्या हातात title=

मुंबई : अभिनेता संजय दत्त याने जेलमधून सुटका झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. १९९३ सालच्या बॉम्बसफोटात अवैधपणे घरात शस्त्र बाळगल्याप्रकरणी संजय दत्त याला ५ वर्षाची शिक्षा झाली होती.

संजय दत्त याने म्हटलं की, 'जेलमधून सुटल्यानंतर छान वाटतंय आणि पिता सुनील दत्त यांची खूप आठवण येतेय. जेव्हा कोर्टान म्हटलं की मी दहशदवादी नाही हे माझ्यासाठी दिलासादायक होतं. माझ्या वडिलांनी हे ऐकण्यासाठी आयुष्यभर वाट पाहिली.'

'मला भारतीय असल्याचा अभिमान आहे त्यामुळे मी या धरतीला आणि तिरंग्याला सल्यूट केलं.'

संजय दत्त याने जेलमध्ये असतांना कागदाची बॅग बनवून ४४० रूपये कमावले. ते त्याने त्याची पत्नी मान्यता दत्त हिच्या हातात दिले.  संजय दत्तने म्हटलं की मान्यता ही माझी चांगली नाही तर सर्वात चांगली अर्धांगिनी आहे. मान्यता हि माझी शक्ती आहे. असं ही संजय दत्तने म्हटलं.