सलमानच करणार बिग बॉसचं होस्टिंग

बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान बिग बॉसच्या पुढचा सिझनही होस्ट करणार आहे.

Updated: Mar 24, 2016, 03:19 PM IST
सलमानच करणार बिग बॉसचं होस्टिंग title=

मुंबई: बॉलीवूडचा दबंग स्टार सलमान बिग बॉसच्या पुढचा सिझनही होस्ट करणार आहे. या आगामी सिझनसाठी सलमान तब्बल 30 टक्के फी वाढवू शकतो. 

बिग बॉसच्या प्रत्येक सिझनआधी सलमान बिग बॉसचं होस्टिंग करणार का नाही याबाबत चर्चा होतात. यंदाही अशाच चर्चा सुरु होत्या, पण या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे, आणि बिग बॉसचा 10 वा सिझनही सलमान होस्ट करेल हे निश्चित झालं आहे.

बिग बॉसच्या मागच्या सिझनमध्ये सलमाननं 6 कोटी रुपये मानधन घेतलं होतं, अशा चर्चा आहेत. यंदाच्या सिझनमध्ये मात्र सलमान मागच्या सिझनपेक्षा 30 टक्के जास्त मानधन म्हणजेच 7.80 कोटी रुपये घेणार असल्याचं बोललं जात आहे.