सलमानचा 'प्रेम रतन धन पायो' सिनेमा करणार रेकॉर्ड

सलमान खानच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमा रिलीज होण्याआधीच रेकॉर्ड करण्याच्या मार्गावर आहे. 

Updated: Mar 25, 2015, 07:25 PM IST
सलमानचा 'प्रेम रतन धन पायो' सिनेमा करणार रेकॉर्ड title=

मुंबई : सलमान खानच्या आगामी 'प्रेम रतन धन पायो' या सिनेमा रिलीज होण्याआधीच रेकॉर्ड करण्याच्या मार्गावर आहे. 

सुरज बडजात्या निर्देशक असलेल्या या सिनेमात एक लांबलचक गाणं शूट करण्यात आलं आहे. 'प्रेम रतन धन पायो' सिनेमातलं हे गाणं १३ मिनीटांचं आहे. 

सुरज बडजात्या यांनी त्यांच्या मागील सिनेमांप्रमाणेच या सिनेमातही गाण्यावर खास लक्ष दिलं आहे. या सिनेमात एकूण ९ गाणे आहेत. हे गाणं १३ मिनीटांचं असल्याचा खुलासा कोरिओग्राफर अहमद खान यांनी केला आहे. या गाण्याची कोरिओग्राफी अहमद खान यांनी केली आहे.

हे गाणं कोणत्याही प्रकारची अंताक्षरी नाही तसंच हे इतर गाण्याचं एकत्रिकरणही नाही. हे पूर्ण गाणंच असणार आहे जे सिनेमाची कथा पुढे घेऊन जाणार आहे.

सलमान या सिनेमात एका राजकुमाराच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात सलमान व्यतिरिक्त सोनम कपूर, स्वरा भास्कर मुख्य भूमिकेत असणार आहेत. सिनेमा यावर्षी नोव्हेंबरमध्ये रिलीज होणार आहे.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.